India Morning News
चंद्रपूर:-
जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. अशोक ऊईके यांच्या अध्यक्षतेखाली “जिल्हा नियोजन समितीची” बैठक नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे पार पडली.
या बैठकीत विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील आंगणवाड्या सुसज्ज व सुबक करण्यासंदर्भात निधी उपलब्ध करावा, जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीमधून शासकीय महाविद्यालयात मृत पावलेल्या रुग्णांसाठी मोफत शववाहिका देण्यात यावी, तसेच चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय व कॅन्सर हॉस्पिटलच्या प्रलंबित कामाचा आढावा घेऊन ते लवकरात-लवकर रुग्णांसाठी उपलब्ध करावे.

जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन अद्ययावत करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा व पोलीस स्टेशन शेजारी अधिकाऱ्यांना निवास स्थानांची व्यवस्था करावी. महिलासांठी राखीव असलेले हिरकणी कक्ष पोलीस स्टेशनमध्ये उभारावे. अशा अनेक विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
यावेळी माझ्यासह खा. श्री. नामदेव किरसान, आ. श्री. किशोर जोरगेवार, आ. श्री. विजय वडेट्टीवार, आ. श्री. करण देवतळे, आ. श्री. किर्तीकुमार भांगडीया, आ. श्री. देवराव भोंगडे, आ. श्री. सुधाकर अडबाले, आ. श्री. अभिजीत वंजारी, जिल्हाधिाकारी श्री. विनय गौंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुलकित सिंग, पोलीस अधिक्षक मुमुक्का सुदर्शन आणि विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि समिती सदस्य उपस्थित होते.











Comments are closed