India Morning News
तुमसर : भारत सरकारने जीएसटी कमी केल्याचे पंतप्रधानांनी जाहीर केले असले तरी, यामागे केवळ श्रेय घेण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट होते. जीएसटी लागू करून नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक ओझे टाकणारे हेच मोदी सरकार होते. त्यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जीएसटीला “गब्बर सिंग टॅक्स” असे संबोधत कडाडून विरोध केला होता. पण त्या वेळी सरकारने या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले.
परिणामी देशात महागाई प्रचंड वाढली, गरिबी वाढली आणि मध्यमवर्गीयांना प्रचंड हाल सोसावे लागले. राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी देशभर नागरिकांना जीएसटीचे खरे नुकसान समजावून सांगितले. या जनजागृतीनंतर मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणाविरोधात तीव्र आवाज उठला.
आज जनतेच्या या विरोधाचा परिणाम लक्षात आल्यानंतर मोदी सरकारने जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यामागून श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न होत असून हे वास्तव आता देशवासीयांच्या लक्षात आलेले आहे असे तुमसर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे यांनी म्हटले आहे.










Comments are closed