Shopping cart

  • Home
  • News
  • छत्रपती संभाजीनगरात प्रथमच ट्रू-बीम तंत्रज्ञानाद्वारे कर्करोग उपचार

छत्रपती संभाजीनगरात प्रथमच ट्रू-बीम तंत्रज्ञानाद्वारे कर्करोग उपचार

April 27, 20251 Mins Read
92

India Morning News

Share News:
Share

छत्रपती संभाजीनगर : येथील राज्य कर्करोग संस्थेत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या हस्ते ‘ट्रू-बीम युनिट’चे उद्घाटन आणि संस्थेच्या विस्तारीकरणाचे लोकार्पण झाले. मराठवाड्यासाठी ही अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा वरदान ठरणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “जीवनशैलीतील बदलांमुळे कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. ट्रू-बीम तंत्रज्ञानामुळे कमीत कमी वेळेत, दुष्परिणामांशिवाय केवळ संक्रमित भागावर उपचार शक्य होतात. यापूर्वी अशा उपचारासाठी टाटा मेमोरियल रुग्णालयात जावे लागत होते. आता छत्रपती संभाजीनगरात ही सुविधा उपलब्ध झाल्याने मराठवाड्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळेल.

”२०१६ मध्ये या रुग्णालयाला राज्य कर्करोग रुग्णालयाचा दर्जा मिळाला होता. आता ट्रू-बीम आणि पेट स्कॅन सुविधेमुळे कर्करोगाचे निदान व उपचार अधिक प्रभावी होणार आहेत. “लवकर निदान झाल्यास कर्करोग पूर्णतः बरा होऊ शकतो. त्यासाठी राज्य सरकार तपासणी मोहिमा राबवत आहे,” असे फडणवीस यांनी सांगितले.

गेल्या २.५ वर्षांत १० नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू झाली असून, वैद्यकीय शिक्षणाच्या जागा वाढल्या आहेत. यासाठी ₹५,००० कोटींचे कर्ज उभारले गेले आहे.पुढील ३-४ वर्षांत सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या समन्वयाने त्रिस्तरीय आरोग्य यंत्रणा उभारली जाईल. “१२ कोटी नागरिकांना आरोग्य विमा कवच प्रदान झाले आहे. सर्व सरकारी रुग्णालयांत उच्च दर्जाच्या सुविधा देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अतुल सावे, खा. डॉ. भागवत कराड, आ. सतीश चव्हाण, आ. संजय केनेकर, आ. अनुराधा चव्हाण आदी उपस्थित होते.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share