Shopping cart

  • Home
  • Pune
  • छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान: सेवा पंधरवडा पुण्यातून प्रारंभ

छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान: सेवा पंधरवडा पुण्यातून प्रारंभ

September 18, 20250 Mins Read
175

India Morning News

Share News:
Share

पुणे: महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्या जनताभिमुख कारभाराच्या संकल्पनेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात “छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान” अंतर्गत सेवा पंधरवड्याचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. हा उपक्रम २ ऑक्टोबर, म्हणजेच महात्मा गांधी जयंतीपर्यंत चालेल. नागरिकांच्या महसूलविषयक अडचणी सोडवणे आणि गेल्या आठ महिन्यांतील नवीन योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा या अभियानाचा उद्देश आहे.

या प्रसंगी उपमुख्यमंत्री व पुणे पालकमंत्री अजित पवार, नाम फाउंडेशनचे संस्थापक अभिनेते नाना पाटेकर यांच्यासह महसूल राज्यमंत्री योगेश कदम, राज्यमंत्री माधुरी मिसळ, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार शंकर जगताप, उमा खापरे, विक्रांत पाटील, भीमराव तापकीर, विजय शिवतारे, बापूसाहेब पठारे, चेतन तुपे, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, बाबाजी काळे, हेमंत रसाने, सुनील शेळके यांची उपस्थिती होती. तसेच अपर मुख्य सचिव विकास खरगे, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे, नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षक रवींद्र बिनवडे, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह अनेक मान्यवर, अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

या अभियानाद्वारे महसूल विभाग नागरिकांना त्वरित सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित केली जाणार असून, पारदर्शक आणि कार्यक्षम प्रशासनाचा हा प्रयत्न नागरिकांच्या हिताचा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share