Shopping cart

  • Home
  • News
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर जिल्ह्यात पिंक ई-रिक्षा वितरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर जिल्ह्यात पिंक ई-रिक्षा वितरण

April 20, 20251 Mins Read
124

India Morning News

Share News:
Share

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर जिल्ह्यात महिला व बालविकास विभागामार्फत आयोजित ‘पिंक ई-रिक्षा वितरण समारंभात’ 50 पात्र महिलांना पिंक ई-रिक्षा वितरित करण्यात आल्या.

या योजनेचा उद्देश महिलांना स्वावलंबी बनवणे आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे हा आहे.महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की, ही योजना मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि नागपूरसह 10 शहरांमध्ये राबविली जाणार आहे.

योजनेअंतर्गत रिक्षा खरेदीसाठी 70% बँक कर्ज, 20% शासकीय अनुदान आणि 10% लाभार्थ्यांचा हिस्सा असेल. पहिल्या टप्प्यात 5,000 रिक्षा वितरित होणार आहेत.

मुख्यमंत्र्यांनी रिक्षा वितरणानंतर स्वत: एका रिक्षात प्रवास करून योजनेचे महत्त्व अधोरेखित केले. या योजनेमुळे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होईल, असे त्यांनी नमूद केले.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share