Shopping cart

  • Home
  • News
  • चिमूर तालुक्यातील आंबेनेरी गावातील महिलेचा क्रेनच्या धक्क्याने मृत्यू

चिमूर तालुक्यातील आंबेनेरी गावातील महिलेचा क्रेनच्या धक्क्याने मृत्यू

April 13, 20250 Mins Read
83

India Morning News

Share News:
Share

चिमूर : चिमूर तालुक्यातील आंबेनेरी गावं येथे सकाळी अंदाजे ९ वाजताच्या दरम्यान गुंड घेऊन हॅन्ड पंप वर पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेलेल्या महिलेला भिसी जांभूळघाट मार्गावरील आंबेनेरी येथे क्रेनने चिरडले.
मृतक महिलेचे नाव शारदा मधुकर डांगे वय ५८ वर्षे राहणार आंबेनेरी ती मोल मजुरी करून आपल्या कुटुंबाचा गाडा चालवायची .

घटनास्थळी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर जमली असून गोसेखुर्द च्या कालव्याच्या नहराच्या कामावरील हि क्रेन असल्याचे सांगितले जात आहे.

तर महिंद्रा बोलेरो पिकअप कॅम्पर या वाहणाला स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी पलटी मारून आंदोलन केले असता तब्बल ४ तास महिलेचे शव घटनास्थळावरून न हलवीता तनावाची परिस्थिती निर्माण झाली होती, तर दुपारी ०१:०० वाजताच्या सुमारास महिलेचे शव विच्छेदन करण्यासाठी चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मृतक महिलेच्या कुटुंबात एक मुलगी व दोन मुले, पती असा आप्त परिवार आहे. पुढील तपास भिसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात पोलिसांतर्फे सुरु आहे

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share