Shopping cart

  • Home
  • News
  • बारावीचा निकाल उद्या 5 मे रोजी होणार जाहीर; ‘या’ संकेतस्थळावर पहाता येईल निकाल

बारावीचा निकाल उद्या 5 मे रोजी होणार जाहीर; ‘या’ संकेतस्थळावर पहाता येईल निकाल

May 4, 20251 Mins Read
78

India Morning News

Share News:
Share

नागपूर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या, 5 मे रोजी जाहीर होणार आहे. निकाल दुपारी 1 वाजता ऑनलाईन पाहता येणार असून, 6 मेपासून विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयातून गुणपत्रिका मिळणार आहे.

बोर्डाच्या वतीने उद्या पत्रकार परिषद घेण्यात येणार असून, त्यात राज्यातील एकूण निकाल व विभागनिहाय निकाल जाहीर केला जाईल. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना खालील संकेतस्थळांवर आपला वैयक्तिक निकाल पाहता येईल:

https://mahresult.nic.in/
http://www.sscresult.mkcl.org/
https://sscresul.mahahsscboard.in
विद्यार्थ्यांनी आपला सीट नंबर व इतर आवश्यक माहिती तयार ठेवावी, जेणेकरून निकाल पाहताना अडचण येणार नाही.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share