Shopping cart

  • Home
  • News
  • भारत-पाकिस्तानमध्ये पूर्ण युद्धविराम; ५ वाजेपासून कारवाया थांबल्या

भारत-पाकिस्तानमध्ये पूर्ण युद्धविराम; ५ वाजेपासून कारवाया थांबल्या

May 10, 20250 Mins Read
628

India Morning News

Share News:
Share

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानदरम्यान तात्काळ आणि पूर्ण युद्धविरामाची अधिकृत घोषणा भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी केली. पाकिस्तानच्या डीजीएमओ यांनी शनिवारी दुपारी ३:३५ वाजता भारताच्या डीजीएमओशी चर्चा केल्यानंतर सायंकाळी ५ वाजेपासून दोन्ही देशांनी सर्व कारवाया थांबवल्या आहेत.दोन्ही देशांचे डीजीएमओ १२ मे रोजी दुपारी १२ वाजता पुन्हा चर्चा करणार असल्याचे मिस्त्री यांनी सांगितले.

आधी घोषणायुद्धविरामाच्या घोषणेपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानने शस्त्रसंधीला सहमती दर्शवल्याचा दावा केला होता. ट्रम्प यांनी एक्सवर पोस्ट करत याबाबत आनंद व्यक्त केला. तसेच, पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांनीही तात्काळ युद्धविरामाची सहमती झाल्याचे म्हटले होते.

आता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत अधिकृत पुष्टी केली आहे.पुढील चर्चेकडे लक्षदोन्ही देशांदरम्यान शांतता कायम राहावी यासाठी १२ मे रोजी होणारी डीजीएमओंची बैठक महत्त्वाची मानली जात आहे. युद्धविरामामुळे सीमेवरील तणाव कमी होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share