India Morning News
▪️कामगार मंत्री आकाश फुंडकर व राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची उपस्थिती
▪️सूमारे बारा लाख वेल्डरची कमतरता यावर होणार मंथन
नागपूर,दि. 9 : औद्यागिक क्षेत्रात होणाऱ्या प्रगतीमुळे विविध उद्योगासमवेत अधिक तंत्रकुशल कर्मचाऱ्यांची कमतरता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. सूमारे बारा लाख वेल्डरची कमतरता असल्याचे एका अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. या संधीवर राज्यातील युवकांना स्वार होता यावे, त्यांना या क्षेत्रातील प्रगतीचे नवे मार्ग मिळावे, या क्षेत्रातील आव्हानांबाबत चर्चा व्हावी याउद्देशाने 11 मे रोजी हॉटेल सेंटर पाईंट एक दिवसीय “बीडब्ल्युयु वेल्ड कनेक्ट” परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते होणार आहे. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
औद्योगिक क्षेत्राच्या नवनवीन विस्तारामध्ये बाष्पक (बॉयलर ) क्षेत्रही अधिक व्यापक होत चालले आहे. विस्तारत चाललेल्या या क्षेत्रातील उद्योजक, बॉयलर निर्माते, तंत्रज्ञ आणि महाराष्ट्र शासनाचे बाष्पके संचालनालय यांनी एकत्र येऊन ही परिषद आयोजित केली आहे. बाष्पके क्षेत्रातील सुरक्षितता, तांत्रिक प्रगती, वेल्डिंग क्षेत्रातील तंत्रकुशलता, आवश्यक रोजगार व संधी बॉयलर बाबतचे प्रमाणिकरण, डिजीटल तंत्रज्ञानाचा या क्षेत्रातील प्रभावी वापर, ऊर्जा क्षेत्रातील आव्हाने आदी विषयावर जागतिक पातळीवरचे तज्ज्ञ यांच्यात विचार मंथन होणार आहे. राज्यभरातील बाष्पक क्षेत्रातील वापरकर्ते व निर्मात्यांना याचा लाभ होईल.
बाष्पके संचालनालयाचे संचालक धवल प्रकाश अंतापूरकर, महानिर्मितीचे संचालक संजय मारूडकर यांची या परिषदेस उपस्थिती राहील.











Comments are closed