Shopping cart

  • Home
  • News
  • नागपुरातील कामठीजवळ रेल्वे ट्रॅकवर युवकाचा मृतदेह आढळल्याने गोंधळ

नागपुरातील कामठीजवळ रेल्वे ट्रॅकवर युवकाचा मृतदेह आढळल्याने गोंधळ

April 17, 20251 Mins Read
1225

India Morning News

Share News:
Share

रेल्वे प्रवासादरम्यान ट्रेनमधून पडल्याची शक्यता

नागपूर: शहरातील कामठी परिसरात असलेल्या नागपूर-हावडा रेल्वेमार्गालागत गुरुवारी पहाटे एका अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. मृताचे नाव ईश्वर नरेंद्र कोतुलवार (वय २२, रा. बाबा बुद्धजी नगर, इंदौरा, नागपूर) असे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळी सुमारे पाचच्या सुमारास रनाळा भागातील शहीद नगरजवळील रेल्वे ट्रॅकवर मृतदेह दिसून आला. घटनेची माहिती मिळताच कामठी पोलीस व फॉरेन्सिक तज्ज्ञांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळी पंचनामा केला असून मृतदेह पुढील तपासासाठी कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, ईश्वर कोतुलवार सध्या रायपूरमध्ये वास्तव्यास होता व तेथेच काम करत होता. मंगळवारी तो सुट्टीसाठी नागपूरमध्ये आपल्या घरी आला होता. गुरुवारी परतीच्या प्रवासासाठी निघाल्यानंतर त्याचा मृतदेह सकाळी ट्रॅकवर आढळला. अंदाजानुसार, तो नागपूर-बिलासपूर शिवनाथ एक्सप्रेसने प्रवास करत असताना ट्रेनमधून पडून त्याचा मृत्यू झाला असावा.

पोलीस अधिक तपास करीत असून मृत्यूमागचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी पोस्टमार्टम अहवालाची प्रतीक्षा आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share