India Morning News
मारेकरा विरुद्ध कठोर कारवाई करुन परिवारांना न्याय द्या
श्री संताजी अखिल तेली समाज संघटन कन्हान शहर संघटनेचे पोलीस निरीक्षक मार्फत मुख्यमंत्रीना निवेदन
कन्हान : – खापरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत पिपळा डाकबंगला शिवारात शुक्रवार (दि.२०) जुन रोजी रात्री २:३० वाजता च्या दरम्यान ग्रामपंचायत सदस्य अतुल पाटील याची निर्घृण करण्यात आली होती . या घटनेने समाजात संतापाची लाट उसळल्याने श्री संताजी अखिल तेली समाज संघटन कन्हान शहर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन अतुल पाटील हत्याकांड प्रकरण फास्टट्रेक कोर्टात चालवुन मारेकरा विरुद्ध कठोर कारवाई करुन परिवारांना न्याय देण्याची
मागणी केली आहे .
तेली समाजाचा ३१ वर्षांचा युवक पिपळा डाकबंगला ग्रामपंचायत सदस्य अतुल पाटील यांची निर्घृण हत्या करण्यात आली . धारदार शस्त्राने २५ ते ३७ घाव मारुन धारदार चाकुचा तुकडा त्याच्या शरीरात असतांना सुद्धा त्याला क्रुरपणे मारण्यात आले . मानवतेला कलंकित करणार असं कृत्य ज्या अपरांध्यानी केले अश्या मारेकरा विरुद्ध कठोर कारवाई करुन प्रकरण फास्टट्रेक कोर्टात चालवुन परिवारांना न्याय द्यावे .
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गुन्ह्याची तपासाची सुत्रे आपल्या हाती घेऊन गुन्ह्यातला मास्टरमाईंड विरुद्ध लवकरात लवकर कारवाई करून न्याय मिळवून द्यावा . ज्यामुळे अपराधी वृत्तीच्या लोकांवरती पोलीस प्रशासनाचा व सरकारचा वचक निर्माण होईल . अशी मागणी श्री संताजी अखिल तेली समाज संघटन कन्हान शहर च्या पदाधिकार्यांनी कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन केली आहे .
यावेळी श्री संताजी अखिल तेली समाज संघटन नागपूर जिल्हा संर्पक प्रमुख सुर्यभान चकोले , कन्हान शहर अध्यक्ष सुनिल सरोदे , कार्याध्यक्ष ऋषभ बावनकर , उत्तमराव वाघमारे , जयंत कुंभलकर , विनोद किरपान , निर्णय कुंभलकर , भगवान लांजेवार , अमित मेघरे , विनोद आष्टणकर आदी उपस्थित होते .








Comments are closed