Shopping cart

  • Home
  • News
  • महापालिकेत 5 मे रोजी “लोकशाही दिन” नागरिकांच्या तक्रारींचे होणार निवारण

महापालिकेत 5 मे रोजी “लोकशाही दिन” नागरिकांच्या तक्रारींचे होणार निवारण

May 2, 20250 Mins Read
50

India Morning News

Share News:
Share

नागपूर ता 2: महापालिकेच्या मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्थायी समिती सभागृहात येत्या 5 मे रोजी “लोकशाही दिन” सकाळी 10 वाजता आयोजित केला आहे. यात जनतेच्या तक्रारी, अडचणी व गाऱ्हाणी ऐकल्या जातील तसेच त्यांचा निपटारा केला जाईल.दर महिन्यातील पहिला सोमवार “लोकशाही दिन” म्हणून आयोजित करण्यात येतो. यात जनतेच्या  लिखीत तक्रारींची दखल घेतली जाते व पुढील महिन्याभरात या तक्रारींचे निराकरण करण्यात येते.  मा. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित विभागीय लोकशाही दिनात नागपूर महापालिकेच्या संबंधित प्राप्त तक्रारींचे निराकरण यावेळी करण्यात येईल.

लोकशाही दिनाला सर्व कक्ष प्रमुख व झोन क्रमांक 1 ते 10 मधील सर्व सहायक आयुक्तांनी माहितीसह उपस्थित राहावे, असे निर्देश मा. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share