Shopping cart

  • Home
  • Sports
  • वर्धा जिल्हयात प्रथमच होणार “देवा भाऊ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा ”

वर्धा जिल्हयात प्रथमच होणार “देवा भाऊ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा ”

May 4, 20251 Mins Read
54

India Morning News

Share News:
Share
• देशातील 27 राज्यांतील खेळाडूंचा असणार समावेश 
• राज्याचे मुख्यमंत्री  यांच्या हस्ते होणार बक्षीस वितरण   
• बॉलीवूड कलाकारांची देखील असणार उपस्थिती 
नागपूर,दि. 4 : अॅम्युचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने कबड्डी असोसिएशन विदर्भ संघ, नागपूर व सार्वजनिक बजरंग व्यायाम शाळा, देवळी यांच्या संयुक्त विद्यमाने 51 वी देवाभाऊ राष्ट्रीय कबड्डी (मुले व मुली ज्युनीयर) स्पर्धेचे आयोजन 9 ते 12 मे या कालावधीत विदर्भ केसरी खासदार रामदासजी तडस इनडोअर स्टेडीयम, देवळी येथे करण्यात आले असून अंतीम सामना व बक्षिस समारंभ   12 मे  रोजी सायंकाळी 6 वाजता भगतसिंग मैदान (सर्कस ग्राऊन्ड), वर्धा येथे होणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून  क्रिडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे राहणार असून अध्यक्षस्थानी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड राहणार आहेत. प्रमुख उपस्थिती  गृह (ग्रामिण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, माजी केंद्रीय राज्य मंत्री  रावसाहेब दानवे, वर्ल्ड कबड्डी फेडरेशन जनरल सेक्रेटरी अॅड. ए. उशीजी रेड्डी, कोल्हापुरचे युवा उद्योजक कृष्णराज महाडिक, प्रमुख अतिथी विधान परीषद सदस्य दादाराव केचे, आमदार राजेश बकाने, आमदार समीर कुणावार, आमदार सुमित वानखेडे उपस्थितीत संपन्न होत आहे.
51 वी देवाभाऊ राष्ट्रीय कबड्डी (मुले व मुली ज्युनीयर) स्पर्धेकरिता  संपूर्ण भारतातून राज्यातील खेळाडू गोवा, गुजरात, राजस्थान, दिल्ली, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, चंदीगड, मध्यप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगढ, उडीसा, आंध्र, कर्नाटक, तामिलनाडू, पांडेचरी, केरला, आसाम, मनिपूर, नागालँड, सिक्कीम, जम्मू काश्मिर, महाराष्ट्र, मिजोरम, लद्दाख आदी राज्य सहभागी होत असून सुमारे 1200 मुले व मुली सहभागी होत आहे.  या स्पर्धेचे आयोजन देवळी येथील विदर्भ केसरी माजी खासदार रामदास तडस इंडोअस स्टेडियम देवळी येथे तर बक्षिस वितरण व समारोप 12 मे रोजी शहिद भगतसिंग मैदान (सर्कस ग्राऊंड) वर्धा येथे आयोजित करण्यात आले आहे.
बक्षीस वितरण व समारोपीय कार्यक्रम 12 मे रोजी  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुभहस्ते व राज्यमंत्री, गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या अध्यक्षेतखाली व प्रमुख उपस्थिती राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आदिवासी विकास मंत्री प्रा.अशोक उईके, माजी केंद्रीय उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल, वर्ल्ड कबड्डी फेडरेशनचे अध्यक्ष तथा ए.के.एफ.आय. जनरल सेक्रेटरी अॅड.  ए.उशी रेड्डी,  विधान परिषद सदस्य दादाराव केचे, आमदार समीर कुणावार, आमदार राजेश बकाणे, आमदार सुमित वानखेडे,  जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान, पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांच्या उपस्थितीत भगतसिंग मैदान, रामनगर, वर्धा येथे होणार आहे.
51 वी देवाभाऊ राष्ट्रीय कबड्डी (मुले व मुली ज्युनीयर) स्पर्धा प्रथमच वर्धा जिल्हयात होणार असून या स्पर्धेत विदर्भातील युवा-युवतींनी सहभाग घ्यावा, असे आवाहन गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री तथा वर्धेचे पालकमंत्री  डॉ. पंकज भोयर यांनी केले आहे. यावेळी  स्वागत समिती अध्यक्ष माजी आमदार सागर मेघे, माजी खासदार तथा अध्यक्ष कबड्डी असो. विदर्भ संघ, नागपूर रामदास तडस, सचिव प्रदिपसिंह ठाकुर, वसंता देवढगले उपस्थित होते.
Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share