India Morning News
नागपूर: आज सायंकाळी (29 सप्टेंबर 2025) कळमना मिनीमाता कमांड एरिया मधील 500 मिमी व्यासाचा वितरण मुख्य जलवाहिनी पाइपलाईन उमिया सोसायटी, कळमना रोड येथे मशीनमुळे नुकसानग्रस्त झाला आहे.
ही जुनी 500 मिमी व्यासाची पाइपलाईन खासगी मालमत्तेखालीून जात होती. त्या ठिकाणी मालमत्ता धारकाने बोरवेलचे काम सुरू केले असताना ही घटना घडली. या घटनेमुळे कलमना मिनीमाता कमांड एरियातील एचडीएमए-2 झोन मधील नागरिकांच्या जलपुरवठ्यावर परिणाम होणार असून दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत पाणीपुरवठा बाधित राहील.
प्रभावित क्षेत्रे:
मिनीमाता नगर, पंच झोपडपट्टी नगर, जनता कॉलनी, जानकी नगर, जलराम नगर, सूर्या नगर, चिखली ले-आउट, औद्योगिक क्षेत्र आणि आदिवासी वसतिगृह परिसर
ऑरेंज सिटी वॉटर (OCW) व नागपूर महानगरपालिका (NMC) यांनी दुरुस्तीची आवश्यक कामे तातडीने सुरू केली असून जलपुरवठा शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पाणीपुरवठ्याबाबत अधिक माहितीसाठी, ग्राहक NMC-OCW हेल्पलाइन क्रमांक 1800 266 9899 वर संपर्क साधू शकतात किंवा contact@ocwindia.com वर ईमेल करू शकतात.











Comments are closed