India Morning News
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा त्यांच्या आर्थिक धोरणामुळे चर्चेत आले आहेत. ट्रम्प यांनी जाहीर केले की, मध्यम आणि जड ट्रकवरील २५ टक्के टॅरिफ आता १ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. याआधी हे टॅरिफ १ ऑक्टोबरपासून लागू करण्याची योजना होती, परंतु उद्योग क्षेत्राकडून आलेल्या प्रतिक्रियांनंतर निर्णय पुढे ढकलण्यात आला.
ट्रम्प यांनी म्हटले, “अमेरिकन उद्योगांना परदेशी स्पर्धकांपासून संरक्षण देणे गरजेचे आहे. त्यामुळे हे टॅरिफ लागू केले जात आहे.” या निर्णयाचा परिणाम अमेरिकेत आयात होणाऱ्या ट्रक आणि वाहन भागांवर थेट होणार आहे. भारत आणि ब्राझीलसह अनेक देश अमेरिकेला ट्रक आणि पार्ट्स निर्यात करतात. त्यामुळे या देशांच्या निर्यात व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ब्राझीलने या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून, अमेरिकेशी असलेल्या व्यापार संबंधांबाबत पुनर्विचार करण्याचे संकेत दिले आहेत. काही दिवसांपूर्वीच ब्राझीलचे अधिकारी म्हणाले होते की, “आमचे आणि अमेरिकेचे संबंध आता जवळपास संपल्यासारखे आहेत.”
ट्रम्प यांनी पूर्वी सांगितले होते की “राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव” आयातीवरील कर लागू केला जात आहे. मात्र, आता त्यांनी हे कारण बदलून “अमेरिकन व्यापार आणि उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी” हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.
ट्रम्प यांच्या मते, “टॅरिफ हा माझा आवडता शब्द आहे. त्यातून देशाला अपार संपत्ती मिळते. पूर्वीपेक्षा अधिक पैसा अमेरिकेत येत आहे. काही देश फक्त आमच्याकडून फायदा घेत होते — आता त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे.”
ट्रम्प यांच्या या नव्या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अनेक देश आता अमेरिकेच्या या टॅरिफ धोरणाविरोधात एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.











Comments are closed