India Morning News
नवी दिल्ली:अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा कठोर धोरण अवलंबत भारतातील काही ट्रॅव्हल एजन्सींवर मोठी कारवाई केली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी एक निवेदन जारी करत काही भारतीय ट्रॅव्हल एजन्सींच्या मालक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अमेरिकेचा व्हिसा बंदीचा निर्णय लागू केल्याची घोषणा केली.
या एजन्सींवर हेतुपुरस्सर बेकायदेशीर स्थलांतराला मदत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अमेरिकेच्या दूतावास आणि कॉन्सुलेट्समधून दररोज अशा प्रकारच्या प्रकरणांची तपासणी केली जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं की, भारतात कार्यरत असलेल्या अशा एजन्सींच्या नेटवर्कवर कारवाई करत त्यांच्यावर निर्बंध लादले जात आहेत. अशा प्रकारच्या कारवायांमुळे अमेरिकेतील इमिग्रेशन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना रोखण्याचा सरकारचा हेतू आहे, असंही त्यांनी सांगितले.
या कारवाईचा परिणाम फक्त भारतापुरता मर्यादित नसून, जागतिक स्तरावर लागू करण्यात आला आहे. व्हिसा वेव्हर प्रोग्रामच्या लाभार्थ्यांनाही हे निर्बंध लागू होणार असल्याचं परराष्ट्र विभागाने स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, अमेरिकेच्या नवी दिल्लीतील दूतावासात याबाबत विचारणा केली असता, संबंधित अधिकाऱ्याने व्हिसा रेकॉर्डच्या गोपनीयतेमुळे विशिष्ट व्यक्ती किंवा संस्थांची नावे जाहीर करता येणार नसल्याचं सांगितले.
प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालानुसार, 2024 अखेरपर्यंत सुमारे 7.25 लाख भारतीय अमेरिकेत स्थलांतरित झाले होते. तर परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, जानेवारी 2025 पासून अमेरिकेने 682 भारतीय नागरिकांना बेकायदेशीर प्रवेशाच्या आरोपाखाली परत पाठवले आहे.






Comments are closed