Shopping cart

  • Home
  • News
  • अंमली पदार्थाची विक्री करणारा आरोपी अटक , गुन्हा दाखल

अंमली पदार्थाची विक्री करणारा आरोपी अटक , गुन्हा दाखल

June 11, 20251 Mins Read
545

India Morning News

Share News:
Share

कन्हान : – अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या विरुद्ध कन्हान पोलीसांनी कारवाई करुन ४६५ ग्राम गांज्यासह एकुण ६,६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

प्राप्त माहिती नुसार रविवार (दि.८) जुन रोजी सायंकाळ च्या दरम्यान कन्हान पोलीस परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली कि शिवनगर कांद्री येथे नंदकिशोर चंदाजी सहानी युवक आपल्या घरी अंमली पदार्थ व गांजा बाळगुन ग्राहकाला विक्री करत आहे . अश्या मिळालेल्या माहिती वरुन पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन पाहणी केली असता आरोपी नंदकिशोर चंदाजी सहानी (वय २२ ) रा.शिवनगर , कांद्री हा पोलीसांना पाहुन पळुन गेला. पोलीसांनी आरोपीच्या घराची झडती घेतली असता घरात ४६५ ग्राम वाजनाचा अंमली पदार्थ गांजा किंमत ४,६५० रुपये आणि इलेक्ट्रॉनिक वजन काटा किंमत २,००० रूपये असा ६,६५० रूपयांचा मुद्देमाल मिळुन आला .

कन्हान पोलीसांनी आरोपी नंदकिशोर सहानी याचा विरुद्ध एन.डी.पीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस डीबी पथक करीत असतांना गुप्त बातमीदाराच्या आधारे पोलीसांनी आरोपी नंदकिशोर सहानी याला मंगळवार (दि.१०) जुन रोजी सायंकाळी अटक केली .

सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड , पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक राहुल चव्हान , हरिष सोनभद्रे , अमोल नागरे , अश्विन गजभिए , जीवन विघे , मोहित झाडे सह आदि पोलीस कर्मचारी यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली .

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share