Shopping cart

  • Home
  • Pune
  • बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा! पूरपरिस्थितीमुळे परीक्षा अर्ज भरण्यास 20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा! पूरपरिस्थितीमुळे परीक्षा अर्ज भरण्यास 20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

September 29, 20251 Mins Read
xii exam applications extended till Oct
127

India Morning News

Share News:
Share

पुणे: राज्यात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. याची दखल घेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) विद्यार्थ्यांना दिलासा देत बारावी (HSC) परीक्षा अर्ज भरण्यासाठी 20 ऑक्टोबर 2025 पर्यंत मुदतवाढ जाहीर केली आहे.

यंदा अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आणि पाणी साचण्याच्या घटनांनी विद्यार्थ्यांना कागदपत्रे जमा करणे, इंटरनेट सुविधा आणि शाळांशी संपर्क साधणे कठीण झाले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य परीक्षा मंडळाने शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे आणि पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना विशेष सवलती देण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे विद्यार्थी तणावमुक्त होऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतील.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share