India Morning News
इस्लामाबाद –
शनिवारी पहाटे भारताने पाकिस्तानातील महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांवर हवाई हल्ले सुरु केले. याच दरम्यान पाकिस्तानात भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
सुमारे १.४५ च्या सुमारास भारतीय लढाऊ विमानांनी पाकिस्तानाच्या हवाई दलाच्या तळांवर क्षेपणास्त्रे डागून कारवाई केली. हे हल्ले सुरु असतानाच जमिनीला भूकंपामुळे हादरे बसले. पाकिस्तानातील भूकंपमापन संस्थेने याची पुष्टी केली असून या भूकंपाची तीव्रता ४ रिश्टर स्केल इतकी होती.
अचानक भूकंपाचे धक्के बसल्यामुळे अनेक पाकिस्तानी नागरिक घराबाहेर धावत निघाले. हवाई हल्ले आणि भूकंप या दोन घटनांनी संपूर्ण देशात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. काही भागांमध्ये लोकांनी सोशल मीडियावर याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करत भीती आणि अनिश्चिततेचा माहोल असल्याचे सांगितले.
सध्या पाकिस्तानातील प्रशासन आणि लष्कर या दोन्ही घटना हाताळण्यासाठी सतर्क आहे. भारताकडून अधिकृत निवेदन अद्याप आलेले नसले तरी या घटनेने दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.











Comments are closed