Shopping cart

  • Home
  • Politics
  • मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ महत्त्वाचे निर्णय;आरोग्य, वाहतूक, गृहनिर्माणसह शहरी विकास क्षेत्राला चालना!

मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ महत्त्वाचे निर्णय;आरोग्य, वाहतूक, गृहनिर्माणसह शहरी विकास क्षेत्राला चालना!

September 23, 20251 Mins Read
77

India Morning News

Share News:
Share

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज विविध विभागांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांमुळे आरोग्यसेवा, वाहतूक, गृहनिर्माण आणि शहरी विकासाच्या योजनांना गती मिळणार आहे.

घेतलेले निर्णय असे –

आरोग्य विभाग-

शासकीय रुग्णालयांचे सक्षमीकरण करण्यासाठी तरतूद.
राज्य आरोग्य हमी सोसायटीसाठी राखीव निधी.
महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेअंतर्गत रुग्ण उपचार दाव्यातून मिळणारा निधी थेट वापरण्यास मंजुरी.

परिवहन विभाग-

नागपूर–नागभीड रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज रुपांतरण जलदगतीने करण्याचा निर्णय.
१९६.१५ किमी नॅरोगेज मार्गाच्या कामासाठी ४९१ कोटी ५ लाख रुपयांचा खर्च मंजूर.

महसूल विभाग-

अकोल्यातील शहर बस स्थानक, भाजी बाजार व वाणिज्य संकुलासाठी २४ हजार ५७९.८२ चौ.मी. जागा महापालिकेला हस्तांतरित.
सोलापूर जिल्ह्यातील कुंभारी येथील महिलांसाठी बांधलेल्या घरांवर मुद्रांक व नोंदणी शुल्कात सवलत.
वसई-विरार महापालिकेला आचोळे (जि. पालघर) येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी जमीन उपलब्ध करून देण्यास मान्यता.
नाशिकरोड येथील महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेला देवळाली येथे १०५५.२५ चौ.मी. जमीन देण्यास मान्यता.

गृह विभाग-

घाटकोपर येथील बेकायदेशीर फलक दुर्घटनेवरील न्यायमूर्ती दिलीप भोसले समितीचा अहवाल स्वीकारला.
समितीच्या शिफारशींनुसार कार्यवाहीसाठी एक महिन्याची मुदत निश्चित.

गृहनिर्माण विभाग-

मुंबईतील अंधेरी (एसव्हीपी नगर) येथे म्हाडामार्फत सामूहिक पुनर्विकास प्रकल्प राबवला जाणार.
१२२ संस्था व ३०७ भुखंडांवरील एकूण ४,९७३ सदनिका नव्याने उभारण्यात येणार.
या निर्णयांमुळे आरोग्यसेवा बळकट होण्यासोबतच वाहतूक, गृहनिर्माण आणि शहरी विकास योजनांना चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share