Shopping cart

  • Home
  • Politics
  • एकनाथ खडसेंचा फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला; अन्याय झाल्याची खंत

एकनाथ खडसेंचा फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला; अन्याय झाल्याची खंत

October 29, 20251 Mins Read
एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस वाद
32

India Morning News

Share News:
Share

जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
“मी भाजपविरोधात काहीही बोललो नाही, पण पक्षात माझ्यावर अन्याय झाला हे सत्य आहे,” असं खडसे म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “मी ४० वर्षं भाजपसाठी निष्ठेने काम केलं, दिवस-रात्र पक्षासाठी झटत राहिलो. त्या मेहनतीमुळेच मला मंत्रिपद मिळालं. मी कधीच असं म्हटलं नाही की भाजपनं काही दिलं नाही. पण आज ज्यांचं योगदान अल्प आहे, त्यांनाही मोठी मंत्रालयं मिळतायत, आणि आम्ही मेहनत करूनही मागे राहिलो — हे खेदजनक आहे.”

मुख्यमंत्रिपद नको म्हणून दूर केलं — खडसे

खडसे यांनी आपल्या राजकीय प्रवासातील कटू अनुभव मांडले.
“मुख्यमंत्रिपदावर मी येऊ नये म्हणून मला १०-१२ खात्यांची ऑफर देण्यात आली होती, पण मी नकार दिला. त्यानंतर मला बाजूला करण्यासाठी राजकीय डावपेच रचले गेले,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.

ईडी आणि अँटी करप्शन मागे लावणारे कोण?

“मी ४० वर्ष प्रामाणिकपणे काम केलं, पण एका दिवसात माझ्यावर गुन्हे दाखल झाले — दाऊदच्या पत्नीशी संबंध, विनयभंगाचे आरोप, अशा गोष्टी कोणी केल्या हे सगळ्यांना माहीत आहे. हे सर्व पडद्यामागून रचले गेलेले राजकीय षडयंत्र आहे,” असं खडसे म्हणाले.

‘भाजपनं तिकिट दिलं नाही, पण मी राजकारणात राहिलो’

“भाजपनं मला ऐनवेळी तिकिट दिलं नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेसने मला नवी संधी दिली. माझा राग भाजपवर नाही, पण मी फडणवीसांना एवढंच विचारतो — जर मी पक्षाची बदनामी केली असेल, तर एक तरी उदाहरण द्या,” असं खडसे म्हणाले.

एकनाथ खडसेंच्या या विधानानंतर राज्याचं राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. त्यांनी भाजपवर अप्रत्यक्ष टीका करत पक्षाशी असलेला जुना संघर्ष पुन्हा अधोरेखित केला आहे. आगामी काळात या वक्तव्याचे राजकीय परिणाम काय होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share News:
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts

Share