India Morning News
वसंतराव नाईक प्रतिष्ठान आणि वनराई फाउंडेशनच्या संयुक्त वतीने मंगळवार, १ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता एनरीको हाइट्स कन्व्हेन्शन हॉल, हॉटेल रेडिसन ब्लू शेजारी, वर्धा रोड येथे ‘प्रयोगशील शेती पुरस्कार 2025’ वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
यंदा सौ. कांचन गडकरी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून रोख ३० हजार रुपये, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कांचनताई गडकरी यांनी मागील २६ वर्षांपासून धापेवाडा येथील त्यांच्या शेतात पारंपरिक पद्धतींच्या जोडीने विविध आधुनिक प्रयोग करत शेती उत्पादनात लक्षणीय वाढ साधली आहे.
हा पुरस्कार ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. सी. डी. मायी यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असून याप्रसंगी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरदराव गडाख यांच्यासह माजी आमदार व वसंतराव नाईक प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. निलय नाईक, सचिव प्रगती पाटील यांची प्रमुख उपस्थित राहील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनराई फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी राहतील. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पर्यावरण तज्ज्ञ डॉ. अजय पाटील यांनी केले आहे.










Comments are closed