India Morning News
कन्हान:- केरडी गावातील शेतकरी क्रिष्णा वानखेडे यांनी शेतीतुन उत्पन्न बरोबर झाले नसल्याने आई , वडीलाच्या नावावर बँकेतुन २ लाख ३५ हजार रूपये घेतले होते . ते दुसऱ्याकडुन उधार घेऊन बँकेत भरले दिड लाख वडिलांच्या नावाने बँकेतुन पुन्हा घेऊन उधार घेतलेले परत केले . लोकांचे कर्ज फेडायचे कि , शेती करण्याकरिता बी , बीऱ्याणे , सलफेट , खते कसे घ्यायचे या आर्थिक विवेंचनात मागील एका महिन्या पासुन तणाव , चिडचिड झाल्याने कौटुंबिक वातावरण कलहाचे झाल्याने क्रिष्णाने पत्नी व दोन लहान मुलांना सासुरवाडी ला सोडुन येऊन शेतीत होणाऱ्या पिकास हमीभाव मिळत नसल्याने कर्ज बाजारी ला कंटाळुन क्रिष्णा वानखेडे या शेतकऱ्यांने राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली .
केरडी गावातील शेतकरी तुकाराम नामदेव वानखेडे (६५) यांना पत्नी लक्ष्मीबाई तुकाराम वानखेडे (६०) क्रिष्णा तुकाराम वानखेडे (४२) , सुनिल तुकाराम वानखेडे (३९) व सचिन तुकाराम वानखेडे (३५) असे तीन मुले , सुना व नातवंड असे कुंटुब एकाच घरात राहत असुन त्यांचे कडे ५ एकर शेती असुन तुकाराम वानखेडे आणि मोठा मुलगा क्रिष्णा हे शेती करून कुंटुबाचे पालन पोषण करीत होते . त्याचे दोन भाऊ खाजगी कामे करित तेही हातभार लावत आहे . परंतु यावर्षी शेतात धान व गहु कमी प्रमाणात उत्पन्न होऊन हमीभाव सुध्दा न मिळाल्याने शेती तोटयात राहल्याने वडिल तुकाराम यांचा नावावर स्टेट बँक कन्हान येथुन दिड लाख कर्ज घेतले . तसेच आई लक्ष्मीबाई च्या नावावर युनियन बँक कांद्री येथुन ८५ हजार रूपये घेतलेले कर्ज इतर लोकांकडुन उसनवारी घेऊन बँकेचे कर्ज भरले असुन वडिलांच्या नावावर परत दिड लाख रूपये कर्ज घेऊन काही लोकांचे परत केले . आईच्या नावावर कर्ज परत घेऊन इतर लोंकाचे कर्ज दिले तर यावर्षी शेती करण्याकरिता बी , बीऱ्याणे , सलफेट , खते कसे घ्यायचे या आर्थिक विवेंचनात मागील एका महिन्या पासुन घरात तणाव , चिडचिड झाल्याने कौटुंबिक वातावरण कलहाचे होऊन क्रिष्णा ने आपली पत्नी व दोन लहान मुलाना सासुरवाडी ला सोडुन येऊन शनिवार (दि.२१) जुन रोजी दुपारी २ वाजता कर्ज बाजारी ला कंटाळुन त्याने राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली . राहुल वानखेडे व गावकऱ्यांनी क्रिष्णा ला कामठी येथील उपजिल्हा रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासुन मृत घोषित केले .मृतकाचे श्वविच्छेदन करून केरडी गावला नेऊन उशीरा रात्रीच श्मशान घाटावर अंतिम संस्कार करण्यात आला .

शेतकरी क्रिष्णा तुकाराम वानखेडे यांनी शेतात होणाऱ्या कमी पिकास हमीभाव मिळत नाही , धानाचा बोनस मिळाला नाही . यात कुंटुबाचे पालन पोषण करायचे कि शेतात लावायला पैसे कुटुन आणायचे अशा आर्थिक विवेंचनेत कर्ज बाजारी ला कंटाळुन त्याने राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली . मृतक क्रिणा वानखेडे ला म्हतारे आई , वडिल , पत्नी पिंकी , मुलगी दिव्याणी १२ वर्ष , मुलगा रेहान ७ वर्ष , लहान दोन भाऊ व त्यांचे परिवार असे कुंटुब असुन हलाखीचे जिवन जगत असल्याने केरडी ग्रामपंचायत सरपंच पिंटु खंडार , किसान ब्रिगेड पारशिवनी तालुका अध्यक्ष राहुल वानखेडे सह गावकरी शेतकऱ्यांनी मृतक क्रिष्णा वानखेडे या शेतकऱ्यांच्या परिवारास सरकार ने आर्थिक मदत करावी अशी मागणी केली आहे .









Comments are closed