India Morning News
पुणे:- दौंडहून पुण्याला येणाऱ्या डेमू ट्रेनच्या एका डब्यात अचानक आग लागल्याची घटना घडली असून, या घटनेमुळे प्रवाशांमध्ये काही काळासाठी भीतीचं वातावरण निर्माण झालं. आग लागल्यानंतर डब्यामध्ये मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले.
घटनेदरम्यान डब्यातील काही प्रवाशांच्या सतर्कतेमुळे वेळेवर आगीची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ आग विझवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने ही आग इतर डब्यांपर्यंत पसरली नाही, अन्यथा मोठा अनर्थ घडू शकला असता.
प्रवाशांनी तातडीने याची माहिती स्थानक मास्तराला दिली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने संबंधित डब्यातील प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले. रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत काही वेळातच आग आटोक्यात आणली.
या घटनेमुळे काही वेळासाठी रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती, मात्र सध्या गाड्या पूर्ववत सुरु करण्यात आल्या आहेत. आग कशामुळे लागली याचा तपास सुरु असून, शॉर्टसर्किट किंवा यांत्रिक बिघाडाचा संशय व्यक्त केला जात आहे.
रेल्वे प्रशासनाकडून या घटनेची सखोल चौकशी सुरू असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अधिक दक्षता घेण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत.










Comments are closed