India Morning News
नागपूर : ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भ ने, लाखों रुग्णांना व्याधीमुक्त करणारे होमिओपॅथीक “धन्वंतरी डॉ.विलास डांगरे यांना विशेष कार्यक्रमात पहिला प्रतिष्ठित “कृतार्थ ज्येष्ठ” पुरस्कार प्रदान केला. कार्यक्रमांचे अध्यक्ष प्रा. प्रभुजी देशपांडे व प्रमुख अतिथि डॉ. पंकज चांदे होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य जीवन व्रत म्हणून करत असतांनाच धर्म, समाज आणि राष्ट्र यांबाबत सर्वत्र जागृती करत असतांनाच गीतेत सांगितलेला “स्थितप्रज्ञ“ जगून कृतज्ञतेचा आविष्कार सादर केला, म्हणुनच “कृतार्थ ज्येष्ठ” पुरस्काराचे ते प्रथम मानकरी.
कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि सामाजिक कार्यातील अग्रणी डॉ. पंकज चांदे यांनाही याप्रसंगी “कृतार्थ ज्येष्ठ” पुरस्कार प्रदान कण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव अँड. अविनाश तेलंग यांनी केले. त्यानंतर “गीत सौरभ संगीत अॅकेडमी तर्फे प्रा. उज्वला अंधारे यांचा “महाराणी कैकेयी” वरील एकपात्री कार्यक्रम संगीताच्या साथीने सादर झाला आणि उपस्थित ज्येष्ठांना कैकेयीची दुसरी बाजू समजली, कार्यक्रम लक्षवेधी आणि प्रभावी होता. आणि अभिनयाचे अनेक पैलू प्रा. उज्वला अंधारे यांनी सादर केले.
त्यानंतर या महिन्यात जन्मदिवस असलेल्या संभासदांचे वाढदिवस साजरे करून त्यांना शाल आणि कुंडीरोपे माननीय अतिथींच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी मार्गदर्शन करतांना पद्मश्री डॉ.विलास डांगरे यांनी सांगितले की मी कार्यकर्ता असल्याने माझे पाय जमिनीवरच राहतील. व्यक्तिनिर्माणाचे कार्य आपल्याला करायचे आहे आणि मातृभूमीचे ऋण फेडणे, वसुंधरेचे संवर्धन करणे हा आपला प्रथम उद्देश असला पाहिजे. याप्रसंगी डॉ. पंकज चांदे यांनी, ज्येष्ठांनी भक्ति मार्गाची कास धारावी, त्यामुळे मन:शान्ती व समाधान लाभेल, असे सांगितले. अध्यक्ष प्रभुजी देशपांडे यांनी उपस्थीतांसहित सर्व ज्येष्ठांना येणाऱ्या दीपावली व नूतनवर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय भाषणानंतर डॉ. अरविन्द शेंडे यांनी सर्वांचे यथोचित आभार मानले.ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रासाठी समाज भवन उपलब्ध करूनदिल्याबद्दल त्यांनी महानगर पालिका अधिकाऱ्यांचे विशेष आभार मानले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. सर्वांनी कोंजागिरिचा मनसोक्त आनंद लुटला. कार्यक्रमाला ज्येष्ठांची भरगच्च उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोहन झरकर, विनोद व्यवहारे, अशोक बांदाणे, प्रकाश मिरकुटे, उल्हास शिंदे , राजभाऊ अंबारे, हेमंत शिंगोडे, वसंतराव बोकडे आणि अनेक इतर कार्यकर्त्यांनी अथक प्रयत्न केले. सैा. वैशाली काळे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी संचालन केले.
सचिव
(अँड. अविनाश तेलंग)









