36
India Morning News
नागपूर, ता. २९ : महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचा वर्धापन दिन गुरुवारी १ मे रोजी सिव्हिल लाईन येथील मनपा मुख्यालयातील हिरवळीवर साजरा करण्यात येणार आहे. गुरुवारी महाराष्ट्र दिनानिमित्त सकाळी ७.१० वाजता मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते ध्वज वंदन करण्यात येणार आहे.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त (शहर) श्रीमती वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त (सेवा) श्रीमती वैष्णवी बी., अतिरिक्त आयुक्त (सामान्य) श्री. अजय चारठाणकर, उपायुक्त श्रीमती विजया बनकर आणि इतर अधिकारी- कर्मचारी उपस्थित राहतील.
मनपातील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच शहरातील नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.








Comments are closed