Shopping cart

  • Home
  • Solapur
  • माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या बंगल्यावर पुराचा विळखा; दोन फॉर्च्युनर आणि ट्रॅक्टर पाण्याखाली

माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या बंगल्यावर पुराचा विळखा; दोन फॉर्च्युनर आणि ट्रॅक्टर पाण्याखाली

September 23, 20250 Mins Read
25

India Morning News

Share News:
Share

माढा (सोलापूर): अतिवृष्टी आणि महापुरामुळे राज्यभरातील परिस्थिती गंभीर झाली असून, माजी मंत्री तानाजी सावंत यांचा वाकाव (ता. माढा) येथील आलिशान बंगला पुराच्या पाण्यात गेला आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये त्यांच्या घराबाहेर उभे असलेले दोन टोयोटा फॉर्च्युनर वाहनं आणि ट्रॅक्टर पूर्णपणे पाण्याखाली गेलेले दिसत आहेत.

बंगल्यातील कुटुंबीयांना बोटीच्या साहाय्याने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. अजून काहीजण घराच्या टेरेसवर अडकलेले असून, त्यांनाही बचाव पथकाद्वारे बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला महापूर आला असून, सोलापूर–विजयपूर महामार्ग बंद होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे.

  • सोलापूर जिल्ह्यातील नुकसानीचे प्रमाणही चिंताजनक आहे.
  • तब्बल दोन लाख हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे.
  • सुमारे दोन लाख बावीस हजार आठशे एक्याऐंशी शेतकरी बाधित झाले आहेत.
  • अकरा तालुक्यांतील ७२९ गावे पुरामुळे थेट फटक्यात आली आहेत.
  • या महिन्यातील नैसर्गिक आपत्तीत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

राज्यातील अनेक भाग पावसाने जलमय झाले असून, अतिवृष्टी आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share