India Morning News
364 बूथ प्रमुख, 104 शक्ती प्रमुख, 26 आघाडी व प्रमुख कार्यकर्त्यांसोबत चर्चा व संवाद
नागपूर : आमदार कृष्णा खोपडे यांचे मार्गदर्शनाखाली तर शहर अध्यक्ष बंटी कुकडे व मंडळ अध्यक्ष सेतराम सेलोकर, शहर संपर्क प्रमुख बाल्या बोरकर यांचे नेतृत्वात पूर्व नागपूरात भारतीय जनता पक्षाच्या संगठन पर्वाला सुरुवात झाली असून मंडळ अध्यक्ष निवडीबाबत प्रत्येक मंडळातील बूथप्रमुख, शक्तीप्रमुख, आघाडी प्रमुख व सर्व प्रमुख कार्यकर्त्यांशी भेटून चर्चा केली. सर्व कार्यकर्त्यांनी पर्यवेक्षकांकडे मनमोकळे पणाने आपले मत व्यक्त केले. या दरम्यान सर्व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह बघायला मिळत आहे. आज 10 एप्रिल ला सकाळी वाठोडा मंडळात 145 तर सायंकाळी वर्धमान मंडळात 125 कार्यकर्त्यांनी आपले मत व्यक्त केले, तर 11 एप्रिल ला सकाळी पारडी मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात येईल.
मंडळाची रचना व निवड प्रक्रिया
पूर्व नागपुरात एकूण 368 बूथप्रमुख,104 शक्ती केंद्र प्रमुख, 26 आघाडीप्रमुख असून त्यासोबतच प्रदेश पदाधिकारी, शहर पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने आहेत. सध्या 1 मंडळ अध्यक्ष असून आता विभागणी करून 3 मंडळ अध्यक्ष निवडले जाईल. पूर्व नागपूरात 10 प्रभागाची विभागणी करून
1) वर्धमान मंडळ – प्रभाग क्रं. 5, 21, 22, 23 – 133 बूथ
2) पारडी मंडळ – प्रभाग क्रं. 4, 24, 25 – 131 बूथ
3) वाठोडा मंडळ – प्रभाग क्रं. 26, 27, 28 – 104 बूथ
अशी रचना करण्यात आलेली आहे. यात सर्व बूथप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख, आघाडी व सर्व प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा व संवाद करून मंडळ अध्यक्षाची निवड केली जाईल.
शहरात सर्वात मजबूत संगठन म्हणून चर्चेत
पूर्व नागपुरातील भारतीय जनता पार्टीचे संगठन सद्यस्थितीत सर्वात मजबूत संगठन मानले जाते. त्याची प्रचीती मागील नुकतेच पार पडलेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत आलेली आहे. त्यानंतर सदस्य नोंदणी प्रक्रियेत 72000 चे लक्ष दिले असता तब्बल 104000 इतकी प्राथमिक सदस्य नोंदणी झालेली आहे. सुरु असलेल्या संगठन पर्वात सर्व कार्यकर्ते सहभाग घेत असून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अगदी लोकशाही पद्धतीने संगठन पदाधिकारी निवडले जात असल्यामुळे मोठा उत्साह कार्यकर्त्यामध्ये बघायला मिळत आहे.
निवडणूक प्रमुख म्हणून वर्धमान मंडळ- सीमाताई ढोमणे, पारडी मंडळ – सुरजसिंग ठाकूर, वाठोडा मंडळ – महेंद्र राऊत जबाबदारी पाहत आहे. तर सहप्रमुख म्हणून ब्रजभूषण शुक्ला व संजय अवचट यांच्याकडे जबाबदारी आहे.










Comments are closed