Shopping cart

  • Home
  • Sports
  • महाराष्ट्रात डिसेंबरमध्ये पहिल्यांदाच फॉर्म्यूला नाईट स्ट्रीट रेस

महाराष्ट्रात डिसेंबरमध्ये पहिल्यांदाच फॉर्म्यूला नाईट स्ट्रीट रेस

September 20, 20251 Mins Read
137

India Morning News

Share News:
Share

नवी मुंबई – महाराष्ट्रात पहिल्यांदाच फॉर्म्यूला नाईट स्ट्रीट रेस होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रेसिंग प्रमोशन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि नवी मुंबई महापालिकेच्या दरम्यान यासाठी करार झाला आहे.

रेसिंग ट्रॅक आणि स्पर्धाजी-
ग्रँड फिनाले डिसेंबरमध्ये नवी मुंबईत होणार आहे.
ट्रॅकची लांबी 3.753 किलोमीटर असून 13 वळण आहेत.
पाम बिच रोड आणि नेरुळ तलाव या मार्गावर रेस होईल.

रोजगार आणि पर्यटनाला चालना-
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “मुंबई स्ट्रीट रेस महाराष्ट्राच्या मोटरस्पोर्टसाठी मोठा टप्पा आहे. यामुळे तरुण रेसर्सना प्रेरणा मिळेल, रोजगार निर्माण होईल आणि पर्यटनासही चालना मिळेल.”

आरपीपीएलचे अध्यक्ष अखिलेश रेड्डी यांनी सांगितले, “मुख्यमंत्री व महापालिकेच्या पाठिंब्याने मुंबईत एक अनोखी मोटर रेसिंग होणार आहे.”

याआधी हैदराबाद, चेन्नई, कोईंबतूर आणि गोव्यात रेसिंग फेस्टिव्हल झाले होते. आता मुंबईत ही स्पर्धा आयोजित होऊन भारतातील मोटरस्पोर्ट क्षेत्राला नवा वेग मिळणार आहे.

 

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share