Shopping cart

  • Home
  • News
  • पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार

पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार

April 11, 20251 Mins Read
500

India Morning News

Share News:
Share

– आतापर्यंत २३ हजार कामगारांना साहित्य वाटप
– नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी कामठी आणि रनाळा क्षेत्रात १५ ते १७ एप्रिल दरम्यान शिबिराचे आयोजन
– गृहपयोगी साहित्य संचाचे वाटप

नागपूर, ता. ११ : राज्याचे महसूलमंत्री तथा नागपूर-अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विशेष पुढाकाराने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातंर्गत आयोजित गृहपयोगी साहित्य संच वाटप शिबिराला बांधकाम कामगारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. १ एप्रिल पासून सुरू झालेल्या या शिबिरात आतापर्यंत 23 हजार नोंदणीकृत कामगारांनी याचा लाभ घेतला आहे.

आता १५ ते १७ एप्रिल दरम्यान कामठी शहर नगर परिषद क्षेत्रात जुने नगर परिषद, कामठी येथे आणि भिलगाव-रनाळा जिल्हा परिषद व येरखेडा नगर पंचायत क्षेत्रात पंकज मंगल कार्यालय, रनाळा या ठिकाणी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारांनाच गृहपयोगी वस्तू संच मिळणार आहे. शिबिरात एकूण 30 गृहपयोगी वस्तूंचा संच दिले जाणार आहेत. कामगारांनी येताना सोबत आधार कार्ड, कामगार नोंदणी पुस्तक, १ रुपया नोंदणी पावती आणि दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणावे.

या शिबिराच्या यशस्वीतेसाठी पालकमंत्री श्री. बावनकुळे यांच्या कार्यालयातील कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते अथक परिश्रम घेत आहेत

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share