India Morning News
नाशिक रोड येथे १५ ते २४ डिसेंबरदरम्यान SSB साठी निःशुल्क छात्रपूर्व प्रशिक्षण
पुणे: भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलात अधिकारी पदावर भरती होण्याची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB) परीक्षेची तयारी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी नाशिक रोड येथे १५ डिसेंबर ते २४ डिसेंबर २०२५ या कालावधीत पूर्णतः मोफत छात्रपूर्व प्रशिक्षण कोर्स आयोजित करण्यात आला आहे.
विशेष बाब म्हणजे या १० दिवसांच्या निवासी प्रशिक्षणात उमेदवारांना प्रशिक्षण, निवास आणि तीन वेळचे भोजन पूर्णपणे मोफत देण्यात येणार आहे. प्रशिक्षणात SSB च्या लेखी परीक्षा, मानसोपचार चाचणी, गटचर्चा, व्याख्यान, अडथळा पार पद्धती, वैयक्तिक मुलाखत आदी सर्व टप्प्यांचे सखोल मार्गदर्शन तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून मिळणार आहे.
हे प्रशिक्षण फक्त पुणे जिल्ह्यातील पात्र उमेदवारांसाठी आहे. इच्छुक उमेदवारांनी येत्या ११ डिसेंबर २०२५ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीसाठी संकेतस्थळावरून प्रवेशपत्र व परिशिष्टे डाउनलोड करून तीन प्रती पूर्ण भरून आणणे बंधनकारक आहे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड यांच्याशी training.pctcnashik@gmail.com या ई-मेलवर किंवा ०२५३-२४५१०३२, ९१५६०७३३०६ (व्हॉट्सअॅप) या दूरध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.) यांनी केले आहे.










