India Morning News
पत्नीच्या स्मरणार्थ कर्करोगग्रस्तांसाठी २० लाखांची देणगी; सामान्यातील असामान्य व्यक्तिमत्त्वाचा आदर्श
नवी मुंबई: दुःख हे कधी वेदनेची खोल खण, तर कधी करुणेचा अथांग सागर बनते. 82 वर्षीय सदानंद विष्णु करंदीकर यांनी आपल्या पत्नीच्या निधनानंतरच्या दुःखाला करुणेच्या स्वरूपात परिवर्तित करत एक प्रेरणादायी उदाहरण घडवले आहे. पत्नी श्रीमती सुमती करंदीकर यांच्या कर्करोगाने झालेल्या निधनानंतर, त्यांनी कर्करोगग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांच्या व्यथेला जवळून अनुभवले.
या अनुभवातून प्रेरणा घेत, त्यांनी पत्नीच्या स्मरणार्थ पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीला प्रत्येकी 10 लाख रुपये, अशा एकूण 20 लाख रुपयांचा धनादेश दान केला. ही कृती केवळ उदारतेचीच नव्हे, तर मानवतेचा शिखरबिंदू ठरणारी आहे.
दुःखाला करुणेची जोड
सेवानिवृत्तीनंतर अपत्य नसल्याने श्री सदानंद आणि श्रीमती सुमती करंदीकर नेरूळमधील आनंद वृद्धाश्रमात राहायला गेले. आयुष्याच्या संध्याकाळी एकमेकांचा आधार असलेल्या या जोडप्याला मागील वर्षी कर्करोगाने श्रीमती सुमती यांना हिरावून नेले. या कठीण काळात कर्करोगग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची आर्थिक आणि मानसिक धडपड करंदीकर यांनी जवळून पाहिली. यातूनच त्यांनी समाजातील गरजूंना मदत करण्याचा संकल्प केला.
आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ त्यांनी कर्करोगग्रस्त रुग्णांच्या कल्याणासाठी 20 लाख रुपये दान करण्याचा निर्णय घेतला. ही रक्कम त्यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीला समान हिस्सा प्रदान केली










Comments are closed