India Morning News
पुणे: प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिने पुणे अपघात प्रकरणावर मौन सोडत आपला या घटनेशी काहीही संबंध नसल्याचे ठामपणे सांगितले. तिचे नाव या प्रकरणात खोट्या पद्धतीने बदनामीसाठी जोडले जात असल्याचा आरोप तिने केला. अपघातानंतर गौतमीच्या मानलेल्या भावाने पीडित कुटुंबाला भेटून मदत देऊ केली होती. मात्र, कुटुंबियांनी कायदेशीर मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी ही मदत नाकारली.
गौतमी म्हणाली, “मी फक्त माझ्या कलेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करते. या अपघाताशी माझा कोणताही संबंध नाही. माझे नाव उगाचच या प्रकरणात ओढले जात आहे.” तिने समाजमाध्यमांवरील खोट्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि टीकाकारांना प्रत्युत्तर देत सत्य समोर येईल, असे आवाहन केले.
पुणे पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. गौतमीने सर्वांना कायदेशीर प्रक्रियेला सहकार्य करण्याचे सांगितले. या घटनेमुळे तिच्या प्रतिमेला धक्का बसत असल्याची खंत तिने व्यक्त केली. या प्रकरणाने पुण्यात मोठी खळबळ उडाली असून, याबाबत पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











Comments are closed