India Morning News
मोहोळ (सोलापूर): भोगावती आणि सीना नदीला आलेल्या पुरामुळे नरखेड (ता. मोहोळ) परिसरातील गावांना मोठा फटका बसला. घाटणे बॅरेजचे तीन गेट बंद असल्याने पुराच्या पाण्याचा फुगवटा वाढला, ज्यामुळे नरखेड, मलिकपेठ, बिटले, एकुरके, वाळूज, डिकसळ आणि देगाव या गावांमध्ये पाणी शिरले. यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले, तसेच घरांमध्ये पाणी घुसल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले.

या नुकसानीची पाहणी करताना ग्रामस्थांनी ‘अरुणोदय फाऊंडेशन’च्या माध्यमातून आमदार रोहित पवार यांना निवेदन सादर केले. यात पंचनामे, नुकसानभरपाई आणि सीना-भोगावती जोड कालव्याची मागणी यांचा समावेश होता. आमदार रोहित पवार यांनी निवेदन स्वीकारताना सरकारपर्यंत मागण्या पोचवण्याचे आश्वासन देण्यात आले. यावेळी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
पुरामुळे शेतातील पिके उद्ध्वस्त झाली, तर घरगुती सामानाचेही मोठे नुकसान झाले. ग्रामस्थांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त करताना बॅरेज व्यवस्थापनातील त्रुटींवर बोट ठेवले. तातडीने नुकसानभरपाई आणि कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी त्यांनी केली.
स्थानिक नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही ग्रामस्थांना सर्वतोपरी मदत करण्याचे आमदार रोहित पवार आश्वासन दिले. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.









Comments are closed