India Morning News
पुणे: भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) संघटन पर्वांतर्गत कसबा मतदारसंघात ‘गाव चलो, वस्ती चलो’ अभियान मोठ्या उत्साहात राबविण्यात आले. या अभियानामध्ये कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने देखील उपस्थित होते.
‘कमळ हीच भाजप कुटुंबातील प्रत्येक सदस्याची खरी ओळख’ या भावनेसह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कमळाचे प्रतीक परिधान करून अभियानाची जोरदार सुरुवात केली.या अभियानाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी मतदारसंघातील विविध वस्त्यांना भेटी देऊन स्वच्छतेची पाहणी केली.
यासोबतच नागरिकांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. अभियानादरम्यान स्वच्छता आणि जागरूकतेवर विशेष भर देण्यात आला.
अभियानात सहभागी कार्यकर्त्यांनी कमळाचे प्रतीक परिधान करून पक्षाच्या एकजुटीचे आणि समर्पणाचे दर्शन घडवले. स्थानिक नागरिकांनीही या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.भाजपच्या या उपक्रमाने कसबा मतदारसंघात भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, येत्या काळात अशा अभियानांचा विस्तार करण्याचा संकल्प पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.







Comments are closed