Shopping cart

  • Home
  • News
  • लग्नसराईत सोन्याच्या दरात घसरण; ग्राहकांसाठी सुवर्णसंधी!

लग्नसराईत सोन्याच्या दरात घसरण; ग्राहकांसाठी सुवर्णसंधी!

October 29, 20251 Mins Read
जळगावमध्ये सोन्याच्या दरात मोठी घसरण
79

India Morning News

Share News:
Share

जळगाव : लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या बाजारातून ग्राहकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत असलेले सोन्याचे दर आता लक्षणीयरीत्या घसरले आहेत. जळगावच्या सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा दर ₹१,२२,५०० वरून ₹१,१८,५०० प्रति १० ग्रॅमपर्यंत खाली आला आहे, म्हणजेच तब्बल ₹४,००० ची घसरण झाली आहे.

काही दिवसांपूर्वी सोन्याचा दर ₹१.३५ लाखांच्या उच्चांकावर पोहोचला होता. मागील दहा दिवसांपासून सुरू असलेल्या या घटेमुळे ग्राहकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. देशभरातील सराफा बाजारातही अशीच परिस्थिती असून बुलियन असोसिएशनच्या आकडेवारीनुसार, सध्या २४ कॅरेट सोनं ₹१,२०,३८०, २२ कॅरेट ₹१,१०,३४८, आणि १८ कॅरेट सोनं ₹९०,२८५ रुपये प्रति १० ग्रॅम दराने उपलब्ध आहे.

चांदीच्या भावातही घट झाली असून, एक किलो चांदीचा दर ₹१,४६,३०० पर्यंत खाली आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे आणि अमेरिका-चीन व्यापार तणावात सैलपणा आल्याने सोन्याच्या दरावर दबाव वाढला आहे. गुंतवणूकदार सध्या नफावसुलीकडे वळले असल्याचे दिसते.

तज्ज्ञांच्या मते, भू-राजकीय स्थिरता आणि केंद्रीय बँकांकडून सुरू असलेली सोन्याची खरेदी यामुळे दर पुन्हा स्थिर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, लग्नसराईच्या हंगामात ही घसरण ग्राहकांसाठी ‘सुवर्णसंधी’ ठरत आहे.

Share News:
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts

Share