Shopping cart

  • Home
  • News
  • आयटीआय मध्ये मुलींना व महिलांना प्रवेशासाठी सुवर्णसंधी

आयटीआय मध्ये मुलींना व महिलांना प्रवेशासाठी सुवर्णसंधी

June 22, 20251 Mins Read
90

India Morning News

Share News:
Share

नागपूर,दि. 20 : राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मधील ऑगस्ट 2025 या सत्रातील प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेनुसार दिनांक 15 मे पासून सुरु करण्यात आलेली आहे. admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशासंबंधीची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे.

अर्ज करणे व प्रवेश अर्ज निश्चित करणे- दि. 15 मे ते 27जून तसेच पहिली, दूसरी, तिसरी व चौथी प्रवेश फेरी दिनांक 10 जुलै ते 19 ऑगस्ट या कालावधीत प्रवेश वेळापत्रकानुसार आहे. समुपदेशन फेरीकरिता नव्याने ऑनलाईन अर्जकरणे व प्रवेश अर्ज निश्चित करण्याचा दिनांक 03 जुलै ते 20 ऑगस्ट व समुपदेशन प्रवेश दि. 25 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट या कालावधीत आहे.

सन 2025-26 करिता एकुण प्रवेश क्षमता 304 विद्यार्थ्यांची आहे. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांनी प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, (मुलींची) नागपूर येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत या कालावधीत निशुल्क स्वरुपात उपलब्ध आहे. सुट्टीच्या दिवशी सुद्धा प्रवेशाची प्रक्रिया व मार्गदर्शन सुरु राहील.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था. (मुलीची) नागपूर येथे अभियांत्रिकी व नॉन अभियांत्रिकी व्यवसाय असुन अभियांत्रिकी व्यवसायात आय.सी.टी.एस.एम. ईलेक्टॉनिक्स मेकॅनिक, आरेखक स्थापत्य, मेकॅनिक कन्जुमर ईलेक्ट्रानिक्स अप्लायन्सेस व नॉन अभियांत्रिकी व्यवसायात कम्पुटर हार्डवेअर अॅण्ड नेटवर्क मेन्टनन्स, कॉम्पूटर ऑपरेटर अॅण्ड प्रोग्रामिंग असिस्टंट, सेक्रेटरीअल प्राक्टीस, कॉस्मेटॉलॉजी, ड्रेस मेकींग, फ्रूट अण्ड वेजीटेवल प्रोसेसींग या व्यवसायाचा समावेश आहे.

शासकीय प्रवेशाकरिता उपलब्ध व्यवसायामध्ये मुलींकरीता 100 टक्के जागा आरक्षणासह राखीव आहेत. उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना शिकाऊ उमेदवारी उपलब्ध प्रशिक्षण कालावधीत ऑन जांब ट्रेनिंगची व्यवस्था आहे. संस्थास्तरावर, जिल्हास्तरावर कॅम्पस इंटरव्युची उत्तम नामांकीत कंपनीमार्फत नोकरी ची संधी उपलब्ध करण्यात येते.

सध्या वाढत असलेलो बेरोजगारी व नोकरीच्या कमी असलेल्या संधी यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा आयटीआय प्रवेशाकडे कल वाढत आहे. आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यास स्वतःचा उदयोग व्यवसाय उभारता येतो. तसेच नौकरीसाठी आयटीआय उत्तम पर्याय असल्याने बहुतांश विद्यार्थीनी आयटीआय ला पंसती देतात. नागपुर जिल्हयात मुलीसाठी एकमेव शासकीय आयटीआय असुन मुलींना कौशल्य प्रशिक्षण घेवुन मोठया प्रमाणात नोकरीची संधी उपलब्ध होत आहे.

स्ट्राईव्ह, दक्ष प्रकल्पातून संस्थेचा दर्जा वाढ झालेला आहे. उत्तम सोईसुविधा, अद्यावत यंत्रसामुग्रो, सुसज्ज कार्यशाळा उपलब्ध आहे. नौकरीची संधी असल्याने मुली मोठया प्रमाणात प्रवेश घेत आहे. यासाठी ग्रामीण व शहरी भागातील मुलीना आयटीआय प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share