India Morning News
‘नवीन नागपूर’ विकासाचा मार्ग मोकळा
नागपूर : विदर्भाच्या हृदयाला विकासाची नवी झेप मिळणार आहे. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (NMRDA), हाउसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (हुडको) आणि नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन (NBCC) यांच्यात महत्त्वपूर्ण करार झाला आहे. या करारामुळे ‘नवीन नागपूर’ या भव्य प्रकल्पाचा विकास होणार असून NBCC प्रकल्प व्यवस्थापकीय सल्लागार म्हणून काम पाहणार आहे.
या अंतर्गत –
1710 एकर क्षेत्रात ‘नवीन नागपूर’ उभारला जाणार आहे.
148 किमी लांबीचा नागपूर आऊटर रिंगरोड तयार होणार आहे.
या विकासासाठी हुडकोकडून तब्बल 11,300 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
त्यापैकी 6,500 कोटी रुपये ‘नवीन नागपूर’साठी खर्च होणार आहेत.
तर 4,800 कोटी रुपये आऊटर रिंगरोडसाठी वापरले जाणार आहेत.
या प्रकल्पामुळे नागपूर शहराचा चेहरामोहरा बदलणार असून, गृहनिर्माण, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. नागपूरकरांना यामुळे रोजगाराच्या संधी, आधुनिक सुविधा आणि सुटसुटीत वाहतुकीचा लाभ होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. खऱ्या अर्थाने ‘नवीन नागपूर’ नागपूरकरांच्या स्वप्नांना नवी उंची देणारा ठरणार आहे.









Comments are closed