Shopping cart

  • Home
  • News
  • गोंदियात साडेतीन लाखांच्या इनामाचा नक्षली वर्गेश उइकाचा आत्मसमर्पण

गोंदियात साडेतीन लाखांच्या इनामाचा नक्षली वर्गेश उइकाचा आत्मसमर्पण

November 11, 20250 Mins Read
गोंदिया येथे नक्षली वर्गेश उइकाचा पोलिसांसमोर आत्मसमर्पण
112

India Morning News

Share News:
Share

गोंदिया: राज्य शासनाच्या आत्मसमर्पण धोरणाचा परिणाम आता प्रत्यक्षात दिसू लागला आहे. साडेतीन लाख रुपयांच्या इनामाचा नक्षली कार्यकर्ता वर्गेश उर्फ कोसा मंगलू उइका याने सोमवारी गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. प्रशासनाकडून त्याचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं.

वर्गेश उइका हा बालवयापासून नक्षली संघटनेत कार्यरत होता. दीर्घकाळ चाललेल्या अंतर्गत दबाव, हिंसाचार आणि थकव्यामुळे त्याने आता शस्त्र खाली ठेवण्याचा निर्णय घेतला. तसेच सरकारच्या पुनर्वसन योजनेवर विश्वास दाखवत तो मुख्य प्रवाहात सहभागी झाला आहे.

या वेळी जिल्हाधिकारी प्रजीत नायर आणि पोलिस अधीक्षक गोरख भामरे उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी त्याच्या निर्णयाचं स्वागत करत सांगितलं की, “अशा आत्मसमर्पणांमुळे नक्षलप्रभावित भागात नागरिकांमध्ये विश्वास निर्माण होतो आणि विकासाला चालना मिळते.”

पोलिसांच्या माहितीनुसार, वर्गेश उइका याच्यावर साडेतीन लाख रुपयांचं बक्षीस घोषित करण्यात आलं होतं आणि तो अनेक गंभीर प्रकरणांमध्ये वॉंटेड होता. सरकारच्या या आत्मसमर्पण आणि पुनर्वसन योजनेमुळे इतर नक्षली कार्यकर्त्यांनाही शांतीचा मार्ग स्वीकारण्यास प्रोत्साहन मिळत आहे.

Share News:
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts

Share