India Morning News
नवी दिल्ली :पाहलगाममध्ये अलीकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांच्या तळांवर मोठी कारवाई केली. या कारवाईनंतर पाकिस्तानने प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय लष्कराने तात्काळ प्रत्युत्तर देत त्यांच्या हवाई तळांवर जबरदस्त आघात केला. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पाकिस्तानवर कठोर शब्दांत टीका केली आहे.
एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना शाह म्हणाले, “मोदी सरकारच्या काळात देशाची सुरक्षा सर्वोच्च प्राधान्य आहे. २०१४ पूर्वी वारंवार दहशतवादी हल्ले होत होते, मात्र योग्य तो प्रत्युत्तर दिलं जात नव्हतं. आता स्थिती पूर्ण बदलली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारतीय सैन्याने जशास तसे उत्तर दिलं. जगभरात भारताच्या लष्करी क्षमतेला सन्मानाने पाहिलं जातं.”
शाह यांनी स्पष्ट केलं की भारताने पाकिस्तानमध्ये तब्बल १०० किमी आत जाऊन कारवाई केली आणि त्यांच्या लष्करी गोटांवर निशाणा साधला. त्यांनी असंही नमूद केलं की देशाची हवाई सुरक्षा यंत्रणा आता अत्यंत सक्षम बनली आहे. मोदी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणावर तीन दहशतवादी हल्ले झाले, पण प्रत्येकवेळी भारताने निर्भयपणे उत्तर दिलं, असंही त्यांनी सांगितलं.
उरी आणि पुलवामा हल्ल्यांनंतर अनुक्रमे सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक केल्या गेल्याची आठवण करून देत शाह म्हणाले, “दहशतवादी अजूनही आपली प्रवृत्ती सोडत नाहीत. त्यामुळेच पहलगाममध्ये पुन्हा हल्ला झाला. पण यावेळी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे त्यांना कठोर धडा शिकवला आहे. ही कारवाई जागतिक लष्करी वर्तुळात अभ्यासाचा विषय बनली आहे.






Comments are closed