Shopping cart

  • Home
  • News
  • बीडसाठी आनंदाची बातमी: टाटा टेक्नॉलॉजीकडून १९१ कोटींची गुंतवणूक, सीआयआयआयटी केंद्राची स्थापना

बीडसाठी आनंदाची बातमी: टाटा टेक्नॉलॉजीकडून १९१ कोटींची गुंतवणूक, सीआयआयआयटी केंद्राची स्थापना

April 16, 20250 Mins Read
246

India Morning News

Share News:
Share

बीड : बीड जिल्ह्यातील विद्यार्थी आणि युवकांसाठी एक मोठी संधी घेऊन येत आहे. औद्योगिक प्रशिक्षण आणि तांत्रिक कौशल्यविकासाच्या माध्यमातून युवकांना उद्योगक्षम बनवण्यासाठी तसेच रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग’ (सीआयआयआयटी) ची स्थापना होत आहे.

यासाठी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने १९१ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.जागतिक दर्जाचे प्रशिक्षण, ७ हजार युवकांना लाभ या अत्याधुनिक केंद्राच्या माध्यमातून दरवर्षी ७ हजार युवकांना जागतिक दर्जाचे औद्योगिक आणि तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे बीड जिल्ह्यात उद्योगपूरक वातावरण निर्माण होण्यास मोठी मदत होईल. हे केंद्र युवकांना नोकरीच्या संधी तर उपलब्ध करून देईलच, शिवाय स्वयंरोजगारासाठीही प्रोत्साहन देईल.

बीडचे पालकमंत्र्यांकडून समाधान

उपमुख्यमंत्री बीडचे पालकमंत्री अजित पवार या प्रकल्पाबद्दल बोलताना त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “टाटा टेक्नॉलॉजीच्या या निर्णयामुळे बीडच्या विकासाला नवीन दिशा मिळेल.

युवकांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.”

जिल्ह्याच्या विकासाला चालना

सीआयआयआयटी केंद्राच्या स्थापनेमुळे बीड जिल्ह्यातील औद्योगिक वातावरणाला चालना मिळेल आणि स्थानिक युवकांना जागतिक बाजारपेठेत स्पर्धा करण्याची संधी मिळेल. हा प्रकल्प जिल्ह्याच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share