Shopping cart

  • Home
  • News
  • राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; महागाई भत्त्यात २% वाढ!

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; महागाई भत्त्यात २% वाढ!

May 16, 20251 Mins Read
46

India Morning News

Share News:
Share

नागपूर: महाराष्ट्रातील सुमारे १७ लाख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने त्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांची वाढ जाहीर केली असून, त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे.

केंद्र सरकारने मार्च २०२५ मध्ये आपल्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरून ५५ टक्के केला होता. त्यानुसार, राज्य सरकारनेही केंद्राच्या निर्णयाच्या धर्तीवर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता २ टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

वित्त विभागाने दिनांक १५ मे २०२५ रोजी यासंबंधीचा अधिकृत शासन निर्णय (GR) प्रसिद्ध केला आहे. ही वाढ जानेवारी २०२५ पासून लागू होणार असून, जानेवारी ते एप्रिल या कालावधीतील फरक थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केला जाईल.

मे महिन्याचा पगार जूनमध्ये वितरित केला जाईल, त्यात वाढीव महागाई भत्ता आणि मागील चार महिन्यांचा फरक समाविष्ट असणार आहे.

या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, राज्य सरकारने केंद्र सरकारच्या पावलावर पाऊल ठेवत हा सकारात्मक निर्णय घेतल्याने कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share