Shopping cart

  • Home
  • Sports
  • महिला विश्वचषकाआधी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी; स्मृती मंधाना पुन्हा नंबर वन फलंदाज

महिला विश्वचषकाआधी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी; स्मृती मंधाना पुन्हा नंबर वन फलंदाज

September 17, 20251 Mins Read
42

India Morning News

Share News:
Share

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार सलामीवीर स्मृती मंधाना आयसीसीच्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थानी पोहोचली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या सामन्यात अर्धशतक ठोकल्यानंतर तिने ही कामगिरी साधली.

मुल्लानपूर येथे झालेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात मंधानाने 63 चेंडूत 58 धावा केल्या होत्या. मात्र तिच्या दमदार खेळी असूनही भारताला विजय मिळवता आला नाही आणि ऑस्ट्रेलियाने सामना सहज जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

विश्वचषकाआधी मंधानाचा आत्मविश्वास वाढला

30 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या महिला क्रिकेट विश्वचषकाआधी मंधानाचे अव्वल स्थान तिच्या आत्मविश्वासात भर घालणारे ठरले आहे. या खेळीमुळे तिने सात रेटिंग गुण मिळवले आणि इंग्लंडच्या नॅट सायव्हर-ब्रंट हिच्यापेक्षा चार गुणांनी पुढे गेली. सध्या मंधानाकडे 735 तर सायव्हर-ब्रंटकडे 731 गुण आहेत. मंधानाने याआधी 2019 मध्ये पहिल्यांदा नंबर वनचा मान पटकावला होता.

इतर भारतीय खेळाडूंचीही प्रगती

पहिल्या सामन्यात 64 धावा करणारी प्रतिका रावल चार स्थानांनी वर जाऊन 42 व्या स्थानी पोहोचली.
हरलीन देओल तिच्या 54 धावांच्या खेळीमुळे 43 व्या स्थानावर पोहोचली.
गोलंदाजीत स्नेह राणा पाच स्थानांची झेप घेत 13 व्या स्थानी पोहोचली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रमवारीतील बदल

ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी तीन स्थानांनी वर सरकून पाचव्या स्थानावर पोहोचली आहे. तर अ‍ॅनाबेल सदरलँड आणि फोबी लिचफिल्ड यांनी शानदार खेळी करत 25 व्या स्थानावर संयुक्तरीत्या मजल मारली. गोलंदाजांच्या यादीत इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन अव्वल स्थानावर कायम आहे.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share