Shopping cart

  • Home
  • News
  • ‘माझी लाडकी बहीण’ योजनेतील महिलांसाठी आनंदवार्ता; मे-जूनचा एकत्रित हप्ता एकदाच ‘या’ दिवशी मिळणार ?

‘माझी लाडकी बहीण’ योजनेतील महिलांसाठी आनंदवार्ता; मे-जूनचा एकत्रित हप्ता एकदाच ‘या’ दिवशी मिळणार ?

June 2, 20251 Mins Read
581

India Morning News

Share News:
Share

मुंबई ::-

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत मिळणाऱ्या महिलांच्या मदतीचा मे आणि जून महिन्यांचा हप्ता एकत्रित करून जूनच्या वटपौर्णिमेच्या सुमारास बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावेळी महिलांच्या खात्यात ३००० रुपये एकत्र जमा होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सरकार प्रत्येक पात्र महिलेला महिन्याला १५०० रुपये थेट त्यांच्या खात्यावर पाठवत असते, पण मे महिन्याचा हप्ता अजूनही देय झालेला नाही. यामुळे अनेक महिलांमध्ये चिंता निर्माण झाली होती.माहिती अशी आहे की, मे आणि जून महिन्याचे हप्ते एकत्र करून एकावेळी जमा करण्याचा विचार आहे. मे महिन्याचा हप्ता तांत्रिक कारणांमुळे विलंबित झाला असून, तो आता जून महिन्यासोबत जमा होईल, अशी शक्यता आहे. या एकत्रित रकमेमुळे महिलांना मोठी मदत होईल.

अधिकृत घोषणा होण्याची अपेक्षा:-

सध्या याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, पण लवकरच माहिती जाहीर होण्याची शक्यता आहे. महिलांनी आपल्या बँक खात्याची माहिती तपासून ठेवावी आणि नोटीफिकेशनची वाट पाहावी.ही बातमी मिळाल्याने लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share