Shopping cart

  • Home
  • News
  • महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी सरकारचे पाऊल;मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ५० पिंक ई-रिक्षांचे होणार वितरण!

महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी सरकारचे पाऊल;मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ५० पिंक ई-रिक्षांचे होणार वितरण!

April 19, 20251 Mins Read
76

India Morning News

Share News:
Share

नागपूर: महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि रोजगाराची संधी देण्यासाठी महिला व बाल विकास विभागाच्या वतीने राबविल्या जात असलेल्या पिंक ई-रिक्षा योजनेअंतर्गत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी, २० एप्रिल रोजी नागपूर जिल्ह्यातील ५० महिला लाभार्थ्यांना पिंक ई-रिक्षांचे वितरण करण्यात येईल.या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन भवनात सकाळी ११ वाजता करण्यात आले असून, यावेळी महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव, महिला व बाल विकास आयुक्त नयना गुंडे, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी उपस्थित राहणार आहेत.

५० महिलांना पिंक ई-रिक्षाचे वितरण

या योजनेअंतर्गत, नागपूर जिल्ह्यात २००० पिंक ई-रिक्षा वितरित केल्या जाणार आहेत. यासाठी २० ते ५० वर्षे वयाच्या इच्छुक महिलांकडून २०४० अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांच्या नेतृत्वाखालील समितीने १०३२ महिलांना मंजुरी दिली आहे. त्यातील ५० पात्र महिलांना पिंक ई-रिक्षा प्रदान केली जाईल.

योजनेचे उद्दीष्ट

महिला व बाल विकास विभागाच्या वतीने महिलांना आर्थिक स्वावलंबन देण्यासाठी आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पिंक ई-रिक्षा योजना राबवली जात आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यात २००० महिलांना रिक्षा वितरित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

ही योजना राज्यातील पुणे, नाशिक, नागपूर, अहमदनगर, अमरावती, संभाजीनगर, सोलापूर आणि कोल्हापूर या आठ जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित केली जात आहे, ज्यामध्ये इच्छुक महिलांना रिक्षा खरेदीसाठी आर्थिक सहाय्य आणि ई-रिक्षा चालवण्यासाठी सर्व आवश्यक सुविधा पुरवण्यात येणार आहेत.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share