Shopping cart

  • Home
  • News
  • विटा येथे उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त व शिवसेना वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

विटा येथे उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त व शिवसेना वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

June 27, 20250 Mins Read
54

India Morning News

Share News:
Share

विटा: उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि शिवसेना वर्धापन दिनानिमित्त विटा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला आमदार सुहास बाबर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ६०व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण वर्ष ‘एकनाथ हिरक आरोग्य वर्ष’ म्हणून साजरे केले जात आहे.

यानिमित्ताने शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर आरोग्य शिबिरे आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात आहे.

विटा शहरात दोन दिवस चालणाऱ्या या रक्तदान शिबिरात आज ५० हून अधिक रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले. यावेळी आमदार सुहास बाबर आणि मंगेश चिवटे यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले व त्यांना ‘एकनाथ रक्तदाता सुरक्षा कवच’ प्रमाणपत्र प्रदान केले.

कार्यक्रमाला विटा मर्चंट बँकेचे चेअरमन विनोद गुळवणी, प्रशांत साळुंखे, गौरव गुळवणी, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे सहकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share