India Morning News
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार शुभारंभ; तयारीचा आढावा घेण्यासाठी महसूलमंत्र्यांची भेट
नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोमवारी नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील चिचोली येथे राष्ट्रीय फॉरेन्सिक विज्ञान विद्यापीठाच्या (नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी) कॅम्पसचे भूमिपूजन करणार आहेत. या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यक्रमस्थळाला भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.
यावेळी माजी आमदार सुधाकर कोहाले, भाजप नागपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्षा अनुराधाताई आमीन, महादुला नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष राजेश रंगारी, कोराडी ग्रामपंचायतचे सरपंच नरेंद्र धनोले, लोणखैरीचे सरपंच लीलाधर भोयर, महादुला नगरपंचायतच्या माजी नगराध्यक्षा कांचनताई कुथे, नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, नागपूर विभागाचे प्रभारी पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांच्यासह इतर संबंधित विभागांचे अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रीय फॉरेन्सिक विज्ञान विद्यापीठाच्या या कॅम्पसच्या स्थापनेमुळे नागपूरच्या शैक्षणिक आणि वैज्ञानिक क्षेत्रात मोठी प्रगती होण्याची अपेक्षा आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे महसूलमंत्र्यांनी यावेळी सांगितले.









Comments are closed