630
India Morning News
कामठी, ता.२४:
राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या २५ मे रोजी रविवारी दुपारी ३ वाजता कामठी तालुक्यातील येरखेडा नगरपंचायत कार्यालय येथे जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यावेळी येरखेडा नगर पंचायत कार्यालयाचे लोकार्पण होईल.

या जनसंवाद कार्यक्रमात मंत्री महोदय नागरिकांची लेखी निवेदने स्वीकारतील. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागरिकांना व्यक्तिशः भेटतील आणि त्यांच्याशी संवाद साधतील. नागरिकांनी आपल्या समस्या, अडचणी, मागण्या लेखी स्वरुपातच (आवश्यक कागदपत्रे जोडून) आणाव्यात. तसेच आपली लेखी निवेदने मा. मंत्री महोदयांना द्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. मंत्री महोदयांना भेटताना कोणीही, हार, पुष्पगुच्छ आणू नये. केवळ लेखी निवेदन स्वीकारली जातील.










Comments are closed