Shopping cart

  • Home
  • News
  • मुलींचे शासकीय वस्तीगृह तुमसर येथे “स्वस्थ नारी-सशक्त परिवार” कार्यक्रम संपन्न

मुलींचे शासकीय वस्तीगृह तुमसर येथे “स्वस्थ नारी-सशक्त परिवार” कार्यक्रम संपन्न

September 22, 20251 Mins Read
40

India Morning News

Share News:
Share

तुमसर: आदिवासी मुलींचे शासकीय वस्तीगृह तुमसर येथे दिनांक २० सप्टेंबरला ‘स्वस्थ नारी-सशक्त परिवार’ कार्यक्रम सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथील एनसीडी विभाग मार्फत घेण्यात आला. डॉक्टर ज्योत्स्ना शिंदे यांनी मौखिक आरोग्यावर वस्तीगृहातील विद्यार्थिनींना सविस्तर आरोग्य शिक्षण दिले. श्रीमती अर्चना लक्षणे यांनी वस्तीगृहातील मुलींना तंबाखू विरोधी शपथ दिली. त्यानंतर वस्तीगृहातील मुलींना मौखिक आरोग्य व त्यावर तंबाखूचे दुष्परिणाम या विषयांवर निबंध स्पर्धा घेऊन प्रथम, द्वितीय व तृतीय तसेच तीन प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले.

वस्तीगृहाचे गृहपाल कुंदा कोकाटे यांनी कार्यक्रम बद्दल आभार मानून डॉ. ज्योत्सना शिंदे यांचा ट्रॉफी देऊन सन्मान केले. या कार्यक्रमात कुंदा कोकाटे (गृहपाल) डॉ. ज्योत्सना शिंदे, अर्चना लक्षणे श्रीराम बावणे, मनोज जाधव व मोठ्या प्रमाणावर वस्तीगृहातील विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share