India Morning News
विदर्भ: महाराष्ट्रात बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात हवामान चिंताजनक झाले आहे. प्रादेशिक हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील तीन ते चार दिवस काही भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.

वादळी वारे आणि विजांचा इशारा: यवतमाळ, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये वादळी वारे तसेच विजांचा कडकडाट होऊ शकतो, असे हवामान खात्याने सांगितले आहे.
नागपूरसाठी येलो अलर्ट: नागपूरसाठी पुढील दोन दिवस येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. हवामान शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी सांगितले की, येत्या काही दिवस हवामान अस्थिर राहणार आहे, त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.
सावधगिरीच्या सूचना: घराबाहेर जाणाऱ्यांनी पावसाच्या वेळी सावध राहावे, ढगाळ आकाश, वारा आणि विजांचा इशारा पाहून नियोजन करावे, तसेच नदीकाठच्या भागात जाणे टाळावे.









Comments are closed